तहसीलदार महिलेच्या पतीकडून जीवाला धोका – रा.कॉ. आमदारांची पोलिसात तक्रार

On: August 10, 2020 3:29 PM

पुणे : खेड तालुक्याच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांचे पती बाळासाहेब आमले यांच्या पासून आपणास धोका असल्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी म्हटले आहे. तशी रितसर तक्रार त्यांनी खेड पोलिस स्टेशनला दिली आहे. सुचित्रा आमले या खेडच्या तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. तहसीलदार सुचित्रा आमले यांच्याविरुद्ध आ. दिलीप मोहिते पाटील यांच्या अनेक तक्रारी आहेत. तहसीलदार यांच्या मनमानी कारभाराबाबत अनेक गावातील सरपंच, प्रतिनिधी व नागरिकांनी तक्रारी केल्याचे आ. मोहिते पाटील यांचे म्हणणे आहे.

आमदार या नात्याने आपण चौकशी सुरु केली असता तहसीलदार यांचे पती बाळासाहेब आमले यांनी विरोधकांकडे आपल्या जीवाला धोका करण्याची थेट वक्तव्य केल्याचे आ. मोहिते पाटील यांचे म्हणणे आहे. त्यांच्याशी आपला थेट संबंध आलेला नाही, मात्र हा माणूस गुंड प्रवृत्तीच्या वातावरणात वावरणारा असल्याचे सांगितले जात असल्याचे देखील आ. पाटील यांनी म्हटले आहे. तहसीलदार यांच्या पतीपासून आपल्या जीवाला धोका असून काही बरेवाईट झाल्यास त्यास तहसीलदार सुचित्रा आमले व त्यांचे पती बाळासाहेब आमले जबाबदार राहतील असे आ. दिलीप मोहिते पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पो.नि. सतीष गुरव तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment