जैन चॅलेंज आंतर शालेय जिल्हास्तरीय फुट बॉल स्पर्धेला सुरुवात

जळगाव – जैन चॅलेंज आंतर शालेय जळगांव जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेला आज अनुभूती आंतरराष्ट्रीय शाळेच्या फुटबॉल मैदानावर सुरूवात झाली. ही स्पर्धा साखळी व नंतर बाद पद्धतीने होणार आहे. या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुले २० संघ तसेच १७ वर्षाखालील मुले २५ संघ व मुली ८ संघ यांचा समावेश आहे. या स्पर्धेत प्रत्येक वयोगटातील ए बी सी डी व ई असे ग्रुप केलेले आहे या प्रत्येक ग्रुप मधून एक संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल.

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे उपाध्यक्ष श्री अभेद्य जैन, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे श्री.अरविंद देशपांडे, श्री. रवींद्र धर्माधिकारी व प्रशिक्षक अब्दुल मोहसीन हे उपस्थित होते. या स्पर्धेत पंच म्हणून पवन सपकाळे, कौशल पवार, हर्षद शेख, दीपक सस्ते, निखिल पाटील, वसीम शेख, अमय तलेलकर,अर्पित वानखेडे, नीरज पाटील, कुलदीप पाटील, व अल्तमशखान हे काम पाहत आहे

आजच्या १४ वर्षाखालील मुलांचे सामने
१. अंजुमन उर्दू स्कूल जामनेर विजयी विरुद्ध ए.टी.जांबरे विद्यालय जळगाव ४-१
२. अनुभूती इंटरनॅशनल स्कूल विजयी विरुद्ध एम.आय.तेली विद्यालय भुसावळ ४-०
३. इकरा रेसिडेन्शिअल स्कूल मोहाडी विजयी विरुद्ध ओरियन सी.बी.एस.ई विद्यालय २-१
अंजुमन विद्यालय जामनेर गोल करणारे खेळाडू अबू रेहान, फरहान खान तसेच अरहान खान यांनी दोन गोल केले तर एटी झांबरे विद्यालय चा भावेश बोरगे याने एक गोल केला. अनुभूतीचे गोल करणारे खेळाडू ध्रुव बोजवानी,आयुष भोर तसेच अभिनव विजयस्वामी यांनी दोन गोल केले. इकरा रेसिडेन्शिअल स्कूल मोहाडीचे गोल करणारे खेळाडू मोहम्मद आरिफ व असमल खान यांनी प्रत्येकी एक गोल केला. आजच्या सामन्यात आराम खान,आयुष भोर व कौस्तुभ महाजन यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून पारितोषिक देण्यात आले. आज पाच सामने. उद्या दि. 3 रोजी सकाळी नऊ वाजता १७ वर्षाखालील मुलांचे पाच सामने होणार आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here