इमारतीवरुन पडल्याने तरुणाचा मृत्यू

जळगाव : इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी जळगाव शहरात घडली. कृष्णा सुधीर अहिरे (20) रा. हरिविठ्ठल नगर जळगाव असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असल्याचे समजते. सुरत रेल्वे गेटनजीक राजमालती नगर परिसरात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

या घटनेचे वृत्त समजताच जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कामकाजाला सुरुवात केली. मयत तरुणाचा मृतदेह सामान्य रुग्णालयात सामान्य रुग्णालयात आणला गेल्यानंतर नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात आक्रोश केला. कृष्णा अहिरे याला कुणीतरी इमारतीवरुन ढकलून दिले असून त्याचा घातपात झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या घटनेबाबत जळगाव शहर पोलिसात नोंद झालेली नव्हती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here