सत्ताधाऱ्यांना भेटणे म्हणजे पक्षप्रवेश नव्हे, चंद्रकांत पाटील यांचा टोला

Chandrakant Patil

मुंबई : राज्यातील सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सतत मतभेद निर्माण होत असल्याच्या बातम्यांनी या सरकारच्या भवितव्याबाबत शंका उपस्थित केली जात आहेत. आज राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले काही आमदार कम बॅक होण्यास इच्छुक असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले होते. नवाब मलिक यांच्या दाव्याला भाजपाचे प्रवक्ते चंद्रकांत पाटील यांनी प्रतीटोला लावला आहे. मतदारसंघातील कामांसाठी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची भेट घेण्यात गैर नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. याचा अर्थ पक्षात प्रवेश करणे असा होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भाजपा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या वृत्तावर चंद्रकांत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या घटक पक्षात सध्या रस्सीखेच सुरु आहे. भाजपाचे काही आमदार आपापल्या मतदारसंघातील कामकाजाच्या निमित्ताने सत्ताधारी रा.कॉ. नेत्यांना भेटले होते. याचा अर्थ ते भाजपात जाणार असा होत नाही. दरम्यान, भाजपाचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटमधे केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here