विज बिल दुरुस्तीसाठी दहा हजाराची लाच मागणी

जळगाव : विज बिलात दुरुस्ती करुन देण्यासाठी अभियंत्याच्या नावाने दहा हजाराची लाच मागणा-या खासगी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल सुधाकर सासनीक (रा. श्रद्धा कॉलनी महाबळ जळगाव) असे लाचेची मागणी करणा-या खासगी इसमाचे नाव आहे.

तक्रारदाराचा एमआयडीसी परिसरात कार दुरुस्तीचा व्यवसाय आहे. या जागेवर असलेल्या व्यावसायिक विज मिटरचा सेक्शन लोड 26KW असतांना येणाऱ्या विज बिलामध्ये लोड 2KW असा नमुद होता. विज मिटर असलेल्या घटनास्थळाला विज मंडळाच्या व्हिजीलन्स पथकाने तपासणी केल्यापासून तक्रारदारास वाढीव रकमेचे बिल येत होते. या बिलामधे सेक्शन लोड 26 KW ऐवजी लोड 18KW अशी दुरुस्ती करायची होती. त्या दुरुस्तीसाठी खासगी इसमाने तक्रारदारास ऑनलाईन अर्ज भरुन देत अभियंता पाचंगे यांच्याकडून दुरुस्ती करुन देतो असे सांगून दहा हजार रुपयांची लाच मागणी केली होती. सदर लाचेची मागणी 22 ऑगस्ट 2022 रोजी करुन ती मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खासगी इसम अनिल सुधाकर सासनिक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here