गणपती विसर्जना दरम्यान तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

जळगाव : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज उघडकीस आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. भगवान राठोड असे समता नगर परिसरातील रहिवासी व कांताई बंधा-यातील पाण्यात बुडून मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

भगवान राठोड हा बांधकामावरील फ्लोरिंग टाईल्स बसवण्याचे काम करत असे. आज 9 सप्टेबरच्या दुपारी चार वाजेच्या सुमारास तो समता नगर परिसरातील गणेश मंडळाचा गणपती विसर्जनासाठी गिरणा नदीवरील कांताई बंधा-यावर गेला होता. इतर तरुणांसोबत त्याला देखील पाण्यात उतरण्याचा मोह झाला. तो मोह त्याच्या जीवावर बेतला. इतर तरुणांनी त्याला पाण्याबाहेर काढून सामान्य रुग्णालयात दाखल केले. दरम्यान वैद्यकीय अधिका-यांनी त्यास मयत घोषित केले. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत पोलिसात या घटनेची नोंद नव्हती. त्याच्या पश्चात आई, एक भाऊ आणि दोन विवाहीत बहिणी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here