दोघा मुलींसह दोघे अपहरणकर्ते तरुण पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : अपहरण करण्यात आलेल्या दोघा मुलींसह त्यांचे अपहरण करणा-या दोघा तरुणांना जिल्हापेठ पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील शिरुर येथून अटक केली आहे. दोघा तरुणांना मदत करणा-या त्यांच्या साथीदारास बांभोरी येथून अटक करण्यात आली आहे. या अपहरण प्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जळगाव जिल्ह्यातील नांद्रा बुद्रुक येथील रहिवासी असलेल्या शेतक-याच्या दोन्ही मुली (एक सज्ञान व एक अल्पवयीन) त्यांच्या काकांकडे आल्या होत्या. काकांच्या रखवालीतून दोघा मुलींना दोघा तरुणांनी पळवून नेले होते. दोघे अपहरणकर्ते तरुण पुणे जिल्ह्यातील शिरुर येथे असल्याची माहिती जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोहेकाँ सलीम तडवी व पोकाँ रविंद्र साबळे यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी पुढील तपासकामी एक पथक तयार केले होते.

बांभोरी येथील रहिवासी असलेल्या जयेश देविदास सोनवणे व हितेश रामचंद्र शिरसाठ या दोघा तरुणांची नावे तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्यांना मदत करणारा त्याच गावातील विवेक सुनिल नन्नवरे याचे देखील नाव पुढे आले. पोलिस उप निरिक्षक गणेश देशमुख व गुन्हे शोध पथकातील पोहेकाँ गणेश पाटील, पोना जुबेर तडवी, पोकाँ अमितकुमार मराठे, पोकाँ समाधान पाटील आदींच्या पथकाने सापळा रचून दोघांना मुलींसह सापळा रचून शिरुर येथून ताब्यात घेत अटक केली आहे. त्यांचा साथीदार विवेक नन्नवरे याला देखील बांभोरी येथून अटक केली आहे. अल्पवयीन मुलीला रिमांड होम मधे तर सज्ञान मुलीला आशादीप वस्तीगृहात हजर करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि राजेद्र पवार करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here