अकरा मोटार सायकलीसह चोरट्यास अटक

जळगाव : चोरीच्या अकरा मोटार सायकलींसह चोरट्यास जळगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. पवन प्रेमचंद पाटील रा.आव्हाणी ता.धरणगांव जि.जळगांव असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. हस्तगत करण्यात आलेल्या मोटार सायकलींमधे दोन बुलेटचा समावेश असून त्यातील एका बुलेटच्या चोरीप्रकरणी भद्रकाली नाशिक येथे तर दुस-या बुलेटचा जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.

सुरत येथून चोरी केलेल्या दोन मोटार सायकलींचा या अकरा मोटार सायकलींमधे समावेश आहे. तिन मोटार सायकलींच्या मालकांचा तपास अद्याप लागलेला नाही. उर्वरीत दोन मोटार सायकली जळगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीतून तर एक शनीपेठ पोलिस स्टेशन हद्दीतून चोरी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नाशिक शहरातून चोरी झालेली एक मोटार सायकल देखील हस्तगत करण्यात आली असून त्याबाबत अधिक तपशील मिळालेला नाही.

गेल्या काही महिन्यांपासून जळगाव शहर हद्दीत मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. मोटार सायकल चोरीचे सतत दाखल होणा-या गुन्ह्यांसह घटनांवर आळा घालण्याकामी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जळगांव शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. विजयकुमार ठाकुरवाड व त्यांच्या सहका-यांनी कंबर कसली होती. गुन्हे शोध पथकाने मोटार सायकल चोरीच्या घटना होत असलेल्या ठिकाणी सापळा रचला होता. गेल्या एक महिन्यांपासून पोलिस पथक चोरट्यांच्या मागावर होते. दररोज या तपासकामाचा आढावा घेतला जात होता.

गेल्या महिन्यात मोटार सायकल चोरीचे प्रमाण कमी करण्यात यश आले मात्र चोरटे मिळून येत नव्हते. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांनी विशेष लक्ष घालून आपल्या सहका-यांना सुचना देण्याचे काम सुरुच ठेवले होते. अखेर मोटार सायकल चोरटा चोरी करण्यासाठी आला असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे 12 सप्टेबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता सापळा लावण्यात आला. दबा धरुन बसलेल्या पोलिस पथकाच्या सापळ्यात मोटार सायकल चोरटा जिल्हा न्यायालय परिसरात अडकला.

पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे, पोहेकॉ विजय निकुंभ, पोहेकॉ भास्कर ठाकरे, पोना प्रफुल्ल धांडे, राजकुमार चव्हाण, पोकॉ रतन गिते, पोकॉ तेजस मराठे, पोकॉ योगेश इंधाटे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. अटकेतील पवन प्रेमचंद पाटील (कुंवर) रा. आव्हाणी – धरणगाव यास न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here