मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार जळगाव जिल्हा दौ-यावर

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार 20 सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जळगाव दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार 20 सप्टेंबर रोजी दुपारी 3.00 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. दुपारी 3.45 वा. पाळधी येथे आगमन.

दुपारी 4.00 वा. पाळधी येथील शासकीय विश्रामगृह नविन इमारतीचा लोकार्पण सोहळा. सायं. 4.30 वा.पाळधी येथून मोटारीने मुक्ताईनगरकडे प्रयाण. सायं. 5.30 वा. मुक्ताईनगर येथे आगमन व जाहिर सभेस उपस्थिती. रात्री सोईनुसार मुक्ताईनगर येथून मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. रात्री सोईनुसार जळगाव विमानतळ येथे आगमन व तेथुन शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here