एसटी वर्क्स शॉपमधील सामानाची चोरी करणा-याविरुद्ध गुन्हा

जळगाव : एसटी वर्क्स शॉपमधील सामानाची चोरी करतांना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर विश्वनाथ साबने रा. गेंदालाल मिल जळगाव असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव आहे.

20 सप्टेबर रोजी दुपारच्या वेळी एसटी वर्क्स शॉप मधील कर्मचा-यांचा चहापानाचा ब्रेक झाला असतांना सदर चोरीची घटना उघडकीस आली आहे. घटनेच्या वेळी एक तरुण वर्क्स शॉपच्या भिंतींच्या आतून चोरीचे सामना फेकत होता आणि त्याचा साथीदार ते रस्त्यावर जमा करत होता. हा प्रकार सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आल्यानंतर रस्त्यावरील चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला.

भितींच्या आतील चोरट्यास सुरक्षा रक्षकासह इतरांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दोन हजार रुपये किमतीचे साडे तिन किलो वजनाचे अल्युमिनीयम विंडो फ्रेम, अल्युमिनीयम पत्रा आणि तिन हजार रुपये किमतीचे नऊ किलो वजनचे लोखंडी वॉटर पंप आणी लोखंडी पत्रा असे साहित्य चोरट्याकडून हस्तगत करण्यात आले. सहायक यंत्र अधिकारी राकेश विक्रम देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here