मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर श्रीकांत शिंदे बसतात? – राष्ट्रवादीचा फोटोसह आरोप

On: September 23, 2022 1:37 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात त्यांच्या खुर्चीवर श्रीकांत शिंदे बसले असल्याचा फोटो ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप केला आहे. राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून आले आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक फोटो ट्वीट करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी हा फोटो ट्वीट केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर या फोटोच्या माध्यमातून टीका करण्यात आली आहे. हा फोटो आपल्याला एका जबाबदार व्यक्तीने आपणास पाठवला असून मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी असलेल्या कार्यालयातील हा फोटो आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री अधिका-यांच्या बैठका घेत असतात. याठिकाणी त्यांचे सुपुत्र बसले असल्याचा तो फोटो आहे. या फोटोच्या माध्यमातून रा.कॉ. कडून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment