अंगावर डिझेल ओतून तरुणाने केला आत्मदहनाचा प्रयत्न

जळगाव : कोविड कालावधीत बजावलेल्या अ‍ॅंम्ब्युलन्स सेवेची थकबाकी शासनाकडून मिळत नसल्यामुळे कर्जबाजारी तरुणाने आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात हे टोकाचे पाऊल उचलले होते. मात्र पोलिसांनी वेळीच पाऊल उचलत तरुणाला ताब्यात घेतले. धिरज अशोक कोसोदे रा. चाळीसगाव असे या तरुणाचे नाव आहे.

धिरज कोसोदे याने कर्जाने काढलेल्या तिन अ‍ॅंम्ब्युलन्स कोवीड कालावधीत चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात भाड्याने लावल्या होत्या. कोवीड कालावधी संपून जनजीवन पुर्ववत झाले तरी देखील त्याची 15 लाख 51 हजार 400 रुपये थकबाकी शासनाकडे आहे. वारंवार शासनदरबारी फे-या मारुन देखील आपल्याला आपली हक्काची रक्कम मिळत नसल्यामुळे धिरज कोसोदे हा तरुण हताश झाला. कर्ज काढून घेतलेल्ल्या अ‍ॅंम्ब्युलन्सचे हप्ते, घरखर्च, पेट्रोल पंपावरील उधारी या आर्थिक संकटात सापडल्यामुळे धिरज यास जीवन नकोसे झाले होते. दरम्यान या घटनेने परिसरात मोठी खळबळ माजली होती.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here