भुसावळच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर मद्यविक्री उघडकीस

जळगाव : भुसावळ रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानावर मद्य, गुटखा, सिगारेट आणि विड्यांची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शनिवारी दुपारी उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे चोरुन लपून रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर मद्यविक्री करणा-यांमधे खळबळ माजली आहे.

भुसावळ रेल्वे जंक्शनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर दिपाली चौधरी यांच्या नावे परवाना असलेल्या खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानावर वरिष्ठ वाणीज्य प्रबंध शिवराज मानसपुरे यांच्यासह आरपीएफ निरीक्षक आर.के. मिणा, वाणिज्य निरीक्षक नितीन राठोड, टीटीई प्रसाद धरणगावकर, आरोग्य निरीक्षक धरमवीर आदींच्या या छाप्यात सहभाग घेतला.

मद्य विक्रीचा प्रकार आढळून आलेल्या या स्टॉलधारकास काळ्या यादीत टाकले जाणार असून त्यांचा परवाना रद्द करण्यात आला असल्याचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसकर यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here