32 हजाराची लाच भोवली वैद्यमापन निरीक्षकास

जळगाव : पेट्रोल पंपाच्या झोनल मशिन स्टॅंपींग करुन प्रमाणपत्र देण्याच्या मोबदलयात 32 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन ती स्विकारणा-या वैद्यमापन निरीक्षकास रंगेहात पकडण्यात आले आहे. सुनिल रामंदास खैरनार (56) असे रावेर येथे कार्यरत असलेल्या वैद्यमापन शास्त्र विभाग निरीक्षकाचे नाव आहे.

या प्रकरणातील तक्रारदार हे भुसावळ येथील रहीवासी आहेत. त्यांनी रावेर येथील एस.एस.बिंबे ॲण्ड सन्स हा पेट्रोलपंप अकरा महीन्याच्या कराराने भाडेतत्वावर चालवण्यास घेतला आहे. या पेट्रोलपंपाच्या चार झोनल मशीन स्टॅम्पिंग करुन त्याबाबतचे स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात शासकीय फि व्यतिरीक्त तक्रारदाराकडे सुनिल खैरनार यांनी 32 हजार रुपयांची लाच मागीतली होती. 32 हजार रुपयांची लाच पेट्रोल पंपाच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागी घेतांना त्यांना एसीबी पथकाने रंगेहात पकडले.

एसीबीचे डीवायएसपी शशिकांत एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.बाळु मराठे, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ,पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.
▶️ मार्गदर्शक-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here