उधारीचे पैसे न दिल्याने झालेला खून उघडकीस

जळगाव : कित्येक दिवसांपासून बाकी असलेली उधारी न दिल्याने भादली परिसरात झालेल्या तरुणाच्या खूनाचा गुन्हा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील हे स्थानिक गुन्हे शाखेत हजर झाल्यानंतर अतिशय कमी दिवसात त्यांनी हा खूनाचा छडा लावला आहे. त्यांच्यासह त्यांच्या पथकाचे कौतुक होत आहे. इश्वर नथु सपकाळे असे अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. 3 ऑक्टोबर रोजी जळगाव येथील सौरभ यशवंत चौधरी या तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस आले होते.

मयत सौरभ यशवंत चौधरी व संशयीत आरोपी ईश्वर नथ्थु सपकाळे हे दोघे मित्र होते. दोघे सोबत रहात होते. अटकेतील संशयीत इश्वर सपकाळे याने मयत सौरभ चौधरी यास दहा हजार रुपये उधार दिले होते. बरेच दिवस झाले तरी सौरभ ते दहा हजार रुपये परत देत नव्हता. त्यामुळे घटनेपुर्वी अनेकदा त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची देखील झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना याबाबत खब-याकडून गुप्त माहिती समजली होती. त्या माहितीचा धागा पकडून त्याचा शोध घेतला असता तो 3 ऑक्टोबर पासून घरी नसल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिस पथकाचा त्याच्यावरील संशय बळावला.

पो.नि.किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पथक त्याच्या मागावर होते. विविध गावांना जावून परिसर पिंजून काढण्यात आला होता. तो कुठे आहे याबाबत त्याच्या परिवारातील सदस्य व्यवस्थित माहिती देत नव्हते. अखेर आज 6 ऑक्टोबर रोजी इश्वर सपकाळे हा कानळदा शिवारात तपास पथकाला मिळून आला. त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली. इश्वर सपकाळे याने मयत सौरभ चौधरी यास दहा हजार रुपये हातउसनवार म्हणून दिले होते. ते पैसे तो परत करत नव्हता. त्यामुळे इश्वरला त्याच्यावर राग होता. जा देत नाही काय करायचे ते करुन घे असे शब्द मयत सौरभ याने इश्वर यास वाद झाला त्यावेळी वापरले होते. त्यामुळे तो राग इश्वरच्या मनात होता. त्या रागातून इश्वर याने विळा आणि रॉड सोबत घेतला होता. आपल्या दुचाकीच्या डिक्कीत त्याने तो रॉड आणी विळा वापरुन सौरभची हत्या केली होती. घटनेनंतर तो घरी आला व काही झालेच नाही अशा अविर्भावात झोपून गेला होता. त्यानंतर दुस-या दिवसापासून तो फरार झाला होता.

या घटनेप्रकरणी मयताच्या आईने नशिराबाद पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मयत सौरभ यास दारु पिण्याचे भारी व्यसन होते. तो काहीही कामधंदा करत नव्हता. त्याची आई किरणा दुकान चालवून परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होती. मयत सौरभच्या वडीलांचे रेल्वे अपघातात निधन झाले आहे. सौरभच्या दारुच्या व्यसनाला वैतागून त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती.

पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्यासह त्यांच्या पथकातील सपोनि जालींदर पळे, पोलिस उप निरीक्षक अमोल देवढे, सफौ रवी नरवाडे, हे.कॉ. संजय हिवरकर, राजेश मेंढे, जितेंद्र पाटील, लक्ष्मण पाटील, महेश महाजन, अक्रम शेख, संदिप सावळे, पोना रणजीत जाधव, विनोद सुभाष पाटील, किशोर राठोड, नितीन बावीस्कर, प्रितम पाटील, ईश्वर पाटील, मुरलीधर बारी, रमेश जाधव आदींच्या पथकाने या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here