पतीपेक्षा अनामिकाला राजेश वाटला जवळचा— अत्याचार होताच तिने रस्ता धरला जळगावचा

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : पुर्वीच्या काळी विवाहीत महिलांकडे केवळ “चुल आणि मुल” एवढीच जबाबदारी होती. घरातील सर्व कामकाज सांभाळून मुलांचे संगोपन व्यवस्थित करावे एवढीच तिच्याकडून अपेक्षा ठेवली जात असे. जुन्या काळात ती अपेक्षा एकप्रकारे वाजवी स्वरुपाची होती. त्यामुळे विवाहीतेचे संपुर्ण लक्ष आपल्या संसारावर केंद्रीत रहात होते. पुरुष मंडळींना आपली नोकरी अथवा आपल्या व्यवसायावर पुर्ण क्षमतेने लक्ष देणे शक्य होत असे. मात्र आता जमाना बदलला आहे.

महागाईचा भस्मासुर आजच्या कलीयुगात गगनाला भिडला आहे. हा महागाईचा भस्मासुर शक्य तेवढा काबुत ठेवण्यासाठी आजकाल पती – पत्नी दोघेही नोकरी अथवा व्यवसाय करण्यासाठी घराबाहेर पडतात. दोघांच्या अर्थार्जनामुळे आर्थिक अडचणींची तिव्रता कमी होण्यास मदत होते. मात्र नोकरीनिमीत्ताने महिलांच्या घराबाहेर पडण्यामुळे अनेक पती पत्नीत कमी अधिक प्रमाणात वाद होण्याचे प्रमाण देखील वाढल्याचे चित्र दिसून येते.

जळगाव शहरातील अनामिका (नाव बदललेले) ही एक खासगी नोकरदार विवाहिता होती. अनामिका आणि तिचा पती दोघेही नोकरी निमीत्त सकाळीच घरातून बाहेर जात होते. अनामिका नोकरी करत असलेल्या संस्थेत एक परप्रांतीय तरुण कामाला होता. राजेशकुमार जयनारायण पासवान असे  त्या  परप्रांतीय तरुणाचे नाव  होते. राजेशकुमार हा बिहार राज्याच्या मुळ रहिवासी होता. अनामिका आणि राजेशकुमार दोघे एकाच ठिकाणी कामाला असल्यामुळे दोघांत चांगली मैत्री झाली होती. दोघे एकमेकांना आपल्या कथा आणि व्यथा शेअर करत होते. दरम्यान अनामिका आणि तिच्या पतीचे घरगुती कारणातून वाद होण्यास सुरुवात झाली होती. पती पत्नीमधील वाद अनामिका नोकरीच्या ठिकाणी राजेशकुमार यास कथन करत होती. तिची व्यथा ऐकून तो तिला धीर देत असे. वास्तविक पती पत्नीमधील वाद बाहेर कुणाकडे सांगायचा नसतो. मात्र अनामिकाला पतीपेक्षा तिचा नोकरीच्या ठिकाणी असलेला मित्र राजेशकुमार जवळचा वाटत होता. त्यामुळे ती त्याला सर्व गोष्टी कथन करत असे. जळगाव तालुक्यातील भडगाव येथील माहेर असलेली अनामिका लग्नानंतर पतीसोबत संसार करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव येथे राहण्यास आली होती. मात्र नंतर पतीच्या नोकरीनिमीत्त तीने जळगाव एमआयडीसी परिसरात आपला संसार थाटला होता.

अवघी 29 वर्ष वयाची अनामिका दिसायला देखणी होती. आठ वर्षाच्या मुलाची आई असलेल्या अनामिकाचे तिशीला टेकलेले तारुण्य लाजवाब होते. तिच्या तारुण्याकडे बघून राजेशकुमार मंत्रमुग्ध होत असे. घरी पतीसोबत वाद झाल्यानंतर नोकरीच्या ठिकाणी समोर राजेशकुमार दिसताच अनामिकाचा मुड ऑन होत असे. तिच्या चेह-यावर प्रसन्नता येत असे. तिने आपला मोबाईल क्रमांक राजेशकुमारला दिला होता. राजेशकुमारने देखील त्याचा मोबाईल क्रमांक तिला दिला होता. तुला कधीही काही मदत लागल्यास मला फोन करत जा असे त्याने तिला म्हटले होते.

गेल्या सप्टेबर महिन्यात अनामिकाचा तिच्या पतीसोबत घरगुती कारणावरुन वाद झाला होता. तु हे घर सोडून माहेरी निघून जा असे तिचा पती तिला रागाने म्हणाला. पतीच्या बोलण्याचा राग आल्यामुळे संतापाच्या भरात अनामिका पतीचे घर सोडून निघून गेली. त्याच कालावधीत राजेशकुमार नोकरी सोडून भोपाळ येथे दुसरी नोकरी करण्यास निघून गेला होता. पतीसोबत जोरदार वाद झाल्यामुळे संतापाच्या भरात घर सोडून निघालेल्या अनामिकाने राजेशकुमारसोबत संपर्क साधला. माझा पतीसोबत जोरदार वाद झाला असून मी घर सोडून कुठेही निघून जात असल्याचे तीने राजेशकुमारला सांगितले. आता मी नोकरी सोडून दिली असून भोपाळ येथे असल्याचे त्याने तिला फोनवर सांगितले. तु कुठेही जावू नको. तु माझ्याकडे भोपाळला ये असे त्याने तिला धीर देत सांगितले. सायंकाळी सात वाजता भोपाळला येण्यासाठी रेल्वे आहे. त्या रेल्वेने भोपाळला येण्यास त्याने तिला सांगितले. “तु मला फसवणार तर नाही ना?” असे तिने त्याला विचारले. “तु माझ्यावर भरोसा ठेव, मी तुला फसवणार नाही. तु निर्धास्तपणे भोपाळला रेल्वेने ये” असे तो तिला म्हणाला. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत ती त्याला भेटण्यासाठी रेल्वेने निघाली.

रेल्वे प्रवासदरम्यान दोघे एकमेकांसोबत मोबाईलच्या माध्यमातून संपर्कात होते. भोपाळला पोहोचल्यानंतर राजेशकुमारने सांगितलेल्या गावाला ती बसने पोहोचली. त्याठिकाणी राजेशकुमार तिचे स्वागत करण्यासाठी सज्ज होता. तो काम करत असलेल्या कंपनीतील एका खोलीवर तो तिला घेवून आला. प्रवासात थकवा आला असेल असे म्हणत त्याने तिला आराम करण्यास सांगितले. काहीवेळाने तो तिला खाण्यासाठी पदार्थ घेवून आला. प्रवासा दरम्यान ती थकली असल्यामुळे तिला लवकरच झोप लागून गेली. तरी देखील काहीवेळाने त्याने तिला शरीरसंबंध ठेवायचे का अशी विचारणा केली. तिने नकार दिला तरी देखील त्याने तिच्यासोबत बळजबरी शरीरसंबंध प्रस्थापित केले.

राजेशकुमारने एका महिलेला कंपनीच्या रुममधे ठेवले असून त्याचे वर्तन योग्य नसल्याचे त्याच्या मालकाच्या लक्षात आले. त्याला नोकरीवर ठेवलेल्या मालकाने त्याला स्पष्ट सांगून टाकले की तु या महिलेला याठिकाणी ठेवू शकत नाही. त्यामुळे दोघे पती पत्नी असल्याचे भासवत राजेशकुमार तिला त्याच्या मित्राच्या रुमवर घेवून आला. पहिल्या दिवशी दोघे स्वतंत्र झोपले मात्र दुस-या रात्री तिला नाईलाजाने राजेशकुमार सोबत झोपावे लागले. तिची इच्छा नसतांना त्याने तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. तिच्यासोबत केलेल्या शरीरसंबंधाची त्याने व्हिडीओ शुटींग देखील केली.

दरम्यानच्या कालावधीत अनामिका हरवल्याबाबत जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला मिसींग दाखल करण्यात आली. पोलिस तिचा शोध घेत होते. याबाबतची कुणकुण राजेशकुमारला लागली. त्याने हा प्रकार तिला सांगितला. त्यामुळे तीने जळगावला परत जाण्याची तयारी दर्शवली. राजेशकुमारचा तिला भोगण्याचा कार्यभाग साध्य झाला होता. त्यामुळे त्याने फारसे आढेवेढे घेतले नाही. तो तिला सोडण्यासाठी भोपाळ रेल्वे स्टेशनवर आला. “तुझ्यासोबत जे काही झाले ते कुणाला सांगू नको” असे तो तिला म्हणाला. “तु माझ्यासोबत जे काही केले ते योग्य नव्हते” असे ती त्याला म्हणाली. त्यावर निर्लज्जपणे तो तिला म्हणाला की “तेवढ्यासाठीच तर मी तुला बोलावले होते”. “तुझ्यावर भरोसा ठेवून मी इथपर्यंत आली आणि तु मला फसवले” असे  ती त्याला म्हणाली. दोघांचे संभाषण सुरु असतांना जळगावला जाणारी रेल्वे आली. त्याने तिला रेल्वेत बसवून दिले. गाडी सुटल्यानंतर दोघे एकमेकांपासून वेगळे झाले.

भोपाळ ते जळगाव रेल्वे प्रवास पुर्ण केल्यानंतर अनामिका जळगाव रेल्वे स्टेशनला उतरली. त्याठिकाणी तिला घेण्यासाठी तिचे मावसा आले होते. ते तिला एरंडोल येथे त्यांच्या घरी घेवून गेले. काही दिवस त्यांच्याकडे मुक्काम केल्यानंतर ती भडगाव येथे आई वडीलांकडे गेली. काही दिवसांनी तिला राजेशकुमारचा फोन आला. माझ्या फेसबुक अकाऊंटवर आपले फोटो कुणीतरी टाकले असल्याचे त्याने तिला सांगितले. ते फोटो नाहिसे करण्यासाठी तुला भोपाळला न्यायालयात येवून सही करावी लागेल अशी बतावणी त्याने तिला केली. आपण दोघे पती पत्नी आहोत असे वकिलांना सांगावे लागेल असे सांगून त्याने तिच्या मनात भिती घालण्यास सुरुवात केली. तिला भोपाळला बोलावून पुन्हा तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करण्याची त्याची इच्छा होती. त्याचा डाव तिच्या लक्षात आला. त्यामुळे तिने पुन्हा भोपाळला जाण्यास नकार दिला.

तिचा नकार ऐकताच त्याने तिला धमकी दिली की तुझ्यासोबत शरीरसंबंध केल्याचा व्हिडीओ तुझ्या पतीसह भावाच्या मोबाईलवर मी पाठवतो. त्यात तुझी बदनामी होईल. त्याचा त्रास असह्य झाल्यामुळे तिने सर्व खराखरा प्रकार आईवडीलांसह पतीच्या कानावर टाकला. तिच्या आईवडीलांसह  पतीने तिला धीर देत राजेशकुमार विरुद्ध पोलिसात तक्रार देण्यास सांगितले. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार याप्रकरणी तीच्या माहेरी असलेल्या भडगाव पोलिस स्टेशनला राजेशकुमार विरुद्ध विविध कलमानुसार शुन्य क्रमांकाने गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हा गुन्हा जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 730/22 भा.द.वि. 376 नुसार वर्ग करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे व  दत्तात्रय बडगुजर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here