संजय राऊत व मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार

sanjay raut

बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या कथित आत्महत्या प्रकरणी  आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना मधून खा. संजय राऊत आपले विचार व्यक्त करत असतात.

शिवसेना नेते खा.संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली जात आहे. सदर तक्रार पाटणा येथे दाखल करण्यात आली आहे. एचएएमचे प्रवक्ते दानिश रिझवान यांनी आपली तक्रार पाटणा पोलिसांना ई मेल च्या माध्यमातून पाठवली आहे. या तक्रारीत खा. संजय राऊत यांच्याशिवाय बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या महापौर, बीएमसी अधिकारी तसेच मुंबई पोलीस आयुक्त यांच्याविरुद्ध ही तक्रार आहे. चौकशी व अटक करण्याची मागणी या तक्रारीत आहे.  

काही दिवसांपुर्वी खा. संजय राऊत यांनी म्हटले होते की सुशांतचे त्याच्या वडीलांसोबत संबंध चांगले नव्हते. त्याचे कारण म्हणजे त्याच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते. दरम्यान बिहार व महाराष्ट्रात राजकीय पातळीवर याविषयी आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

सुशांत प्र्करणी बिहार सरकारने सीबीआय चौकशीची शिफारस केली आहे. याउलट महाराष्ट्र सरकारचा त्यास विरोध कायम आहे. आत्महत्येचे घटनास्थळ मुंबईत असतांना पाटणा पोलिसांना चौकशीचा अधिकार नसल्याची महाराष्ट्र सरकारची भुमिका आहे. तपासकामी पाटणा पोलिस मुंबईत आले असता त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते.

दरम्यान सीबीआयकडे हे प्रकरण सोपविण्याची बिहार सरकारची शिफारस केंद्राने मान्य केली आहे. रिया चक्रवर्ती ने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालय 13 ऑगस्ट रोजी याचा निर्णय देणार आहे. सुशांतच्या खात्यातून विड्रॉल करण्यात आलेल्या 15 कोटींबाबत ईडी कडून रिया चक्रवर्ती व  तिच्या परिवाराची सतत चौकशी सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here