काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजीव त्यागी यांचे निधन

On: August 12, 2020 10:10 PM

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजीव त्यागी यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राजीव त्यागी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना गाजीयाबादच्या रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांनी आज शेवटचा श्वास घेतला. राजीव त्यागी एक कट्टर काँग्रेस नेते.

राजीव त्यागी हे स्पष्ट वक्ते आणी आपले मत उघडपणे मांडणारे म्हणून ओळखले जात होते. टीव्ही चॅनलच्या चर्चेत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा आणि राजीव त्यागी यांच्यातील शाब्दिक खडाजंगी दिसून येत असे. आपले मुद्द्यांची ते पुराव्यासह मांडणी करुन ते बोलत असत. गतवर्षी काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी राजीव त्यागी यांची उत्तर प्रदेशचे मीडिया प्रभारी म्हणून नेमणूक केली होती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment