अजय देवगण दिग्दर्शित करणार ‘भोला’

On: November 2, 2022 10:36 AM

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याचा ‘थँक गॉड’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘थँक गॉड’मध्ये त्याने चित्रगुप्ताची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अजय देवगणसह सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीतची भूमिका आहेत. २५ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात झळकला. या चित्रपटाकडून निर्मात्यांना खूप अपेक्षा होत्या मात्र तीन दिवसात हा चित्रपट फारशी कमाई करु शकला नाही.

‘थँक गॉड’नंतर अजय देवगणचा ‘दृश्यम २’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ चित्रपटाचा पुढील भाग यामधे असणार आहे. अजय देवगण पुन्हा दिग्दर्शनाकडे वळला आहे. अजय देवगण भोला हा चित्रपट दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटात अभिनेत्री तब्बू पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे.

याच चित्रपटात आता एक दाक्षिणात्य अभिनेत्री अमला पॉल देखील दिसणार आहे. डिसेंबर महिन्यात ती चित्रपटाच्या चित्रीकरणात सामील होईल. अमला पॉलने प्रामुख्याने तामिळ, मल्याळम आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment