अमेरिकन पॉर्नस्टारने शाहरुखला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

On: November 2, 2022 1:24 PM

किंग खान अर्थात शाहरुख खान याचा आज 57 वा वाढदिवस आहे. आपल्या अभिनयाच्या माध्यमातून शाहरुख खान याने आपला वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. किंग खानचे जगभरात चाहते आहेत. ‘कभी खुशी कभी गम’, ‘मोहबते’, ‘कल हो ना हो’, ‘रईस’ यासारखे एकाहून एक हिट चित्रपट त्याने दिले आहेत.

अमेरिकन पॉर्नस्टार किंद्रा लस्टने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून शाहरुखला खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. किंद्रा हॉलिवूड तसेच अडल्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये पॉर्न स्टार म्हणून ओळखली जाते. किंद्राने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शाहरुखचा आगामी चित्रपट पठानचे पोस्टर शेअर केले आहे. तिने ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा शाहरुख’ असं कॅप्शन दिलं आहे. या पोस्टमध्ये तिने शाहरुखला टॅगही केलं आहे.

एकाने कमेंट करत “शाहरुख खानचा जलवा”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “भाई का स्वॅग अलग है”, अशी कमेंट केली आहे. शाहरुख तब्बल नऊ वर्षांनंतर चाहत्यांसाठी चित्रपटांची मेजवानी घेऊन येत आहे. पठाण, जवान या चित्रपटांतील त्याचा लूक व्हायरलही झाला आहे. सलमान खानच्या टायगर 3 मध्ये तो पहिल्यांदाच केमिओ करताना दिसणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment