अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-यास एक वर्ष कारावास

On: November 3, 2022 7:47 AM

जळगाव : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-या तरुणास न्यायालयाने एक वर्षाचा तुरुंगवास आणि दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सागर सुरेश मराठे (रा. धरणगाव) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. विशेष पोस्को तथा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायमुर्ती बी.एस.महाजन यांनी हा निकाल दिला आहे.

19 मे 2016 रोजी पिडीत बालिका तिच्या घराच्या अंगणात झोपली असतांना मद्याच्या नशेत आलेल्या सागर मराठे याने अर्धनग्न अवस्थेत येत तिच्यासोबत अश्लिल वर्तन केले. या प्रकारामुळे घाबरलेल्या बालिकेने आरडाओरड केली. तिच्या आवाजाने तिचे आईवडील व नातेवाईक धावत आले. त्यांनी सागर यास पकडून बालिकेचा बचाव केला. या घटनेप्रकरणी खटल्यात विशेष सरकारी वकील अ‍ॅड. चारुलता बोरसे यांनी आठ साक्षीदारांची तपासणी करत युक्तीवाद पुर्ण केला. यात पिडीतेसह तिच्या आईची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजुच्या युक्तीवादासह सर्व साक्षी पुराव्यांच्या आधारे सागर मराठे यास दोषी धरत शिक्षा सुनावण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment