चिरंजीवींसह उर्वशी रौतेला झळकणार आयटम सॉंगमधे

On: November 5, 2022 12:04 PM

दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी आगामी ‘वॉल्टेयर वीरैया’ या चित्रपटात दिसणार आहे. मकर संक्रांतीच्या मुहुर्तावर सन 2023 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात चिरंजीवीसह दाक्षिणात्य अभिनेता रवी तेजा हा देखील प्रमुख नायकाच्या भुमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला देखील दिसणार आहे.

या चित्रपटात चिरंजीवी आणि रवी तेजा यांच्यावर एक गाणं चित्रीत करण्यात येणार आहे. उर्वशी चित्रपटातील या आयटम सॉंगमध्ये झळकणार आहे. त्यामुळे चिरंजीवी, रवी तेजा आणि उर्वशी हे त्रिकुट पहिल्यांदाच चाहत्यांना ऑन स्क्रीन दिसणार आहे. उर्वशीचं चित्रपटातील आयटम सॉंग प्रसिद्ध कोरिओग्राफर शेखर मास्टर यांनी कोरिओग्राफ केलं असून लवकरच त्याच्या चित्रीकरणालाही सुरुवात होणार आहे. उर्वशीने याआधीही अनेक आयटम सॉंगद्वारे तिचा जलवा मोठ्या पडद्यावर दाखवला आहे. ‘रेशम का रुमाल’, ‘आय वाना तेरा इश्क’, ‘लिपस्टिक लगा के’ अशा हिट गाण्यांमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

वॉल्टेयर वीरैया या चित्रपटात चिरंजीवींसह दाक्षिणात्य अभिनेत्री श्रुती हसन मुख्य नायिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे. चिरंजीवींच्या या अक्शनपटाची चाहतेही आतुरतेने वाट बघत आहेत. दरम्यान सलमान खानबरोबरचा चिरंजीवींच्या गॉडफादर या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटालाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment