बुलढाणा : बुलढाणा जिल्हयाच्या चिखली येथील अवघ्या नऊ वर्षाच्या बालिकेस पळवून नेत तिच्यावर अत्याचार व जखमी करणाऱ्या दोघा आरोपीतांना आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सागर विश्वनाथ बोरकर व निखील लिंबाज गोलाईत अशी शिक्षा सुनावलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. विशेष न्यायमुर्ती चित्रा एम. हंकारे यांनी दोघा आरोपींना दोषी धरत फाशीची शिक्षा सुनावली आहे.
27 एप्रिल 2019 रोजी मध्यरात्रीच्या वेळी दोघा आरोपींनी अल्पवयीन मुलीला त्यांच्या ताब्यातील स्कुटीवरुन पळवून नेले होते. त्यानंतर स्मशानभूमी समोरच्या मोकळ्या जागी तिच्यावर आळी-पाळीने लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी पीडितेच्या वडीलांनी त्याच दिवशी पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी दोघा आरोपींविरुध्द विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाचा प्राथमीक तपास पोलिस निरिक्षक गुलाबराव वाघ यानी केला. पुढील सखोल तपास डीवायएसपी बाबुराव महामुनी यांनी पुर्ण केला. पोलिस कर्मचारी शरद गिरी व महिला पोलिस कर्मचारी ज्योती मुळे यांनी त्यांना तपासकामी सहकार्य केले.
सर्व साक्षी पुरावे जुळून आल्यामुळे पीडित मुलीवर आरोपींनी अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले. सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील ॲड. वसंत भटकर, ॲड. सोनाली सावजी यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. पैरवी पोलिस कर्मचारी सुनील पवार यांनी त्यांना सहकार्य केले. पीडित मुलीला महिला व बालकल्याण सदस्य किरण राठोड यांनी सहकार्य केले.