भारत जोडोसाठी पाचोरा कॉंग्रेसची जम्बो बैठक

On: November 5, 2022 2:41 PM

जळगाव : भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होत आहे. या यात्रेत पाचोरा शहरासह तालुक्यातील जनतेचा मोठ्या संख्येने सहभाग राहणार आहे. या संदर्भात चर्चेसाठी पाचोरा कॉंग्रेसच्या वतीने 6 नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृहात दुपारी दोन वाजता जम्बो बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीला जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार, भारत जोडो यात्रेचे जिल्हा समन्वयक माजी जिल्हाध्यक्ष अॅड संदिप पाटील, जिल्हा सरचिटणीस जमिल शेख आदींची उपस्थिती राहणार आहे. राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रेत सहभाग घेण्यासाठी पाचोरा शहर व तालुक्यातुन असंख्य युवकांसह नागरिक उत्सुक आहेत. या बैठकीस अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment