आलिया भट्ट लवकरच देणार गुड न्युज

On: November 6, 2022 10:44 AM

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच एका बाळाला जन्म देणार असून ती आई होणार आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच आई-बाबा होणार असल्यामुळे ते दोघेही चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी आलियाच्या प्रसूतीची तारीख समोर आली होती. येत्या नोव्हेंबर महिन्याअखेरपर्यंत ती बाळाला जन्म देऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र त्यापूर्वीच आलिया भट्ट ही रुग्णालयात दाखल झाली आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे गिरगावातील ‘एच.एन.रिलायन्स’ रुग्णालयात पोहोचले आहेत. पहिल्या बाळाच्या प्रसूतीसाठी ते दोघेही रुग्णालयात दाखल झाल्याची माहितीसमोर येत आहे. गिरगावातील ‘एच.एन.रिलायन्स’ रुग्णालयात आलिया तिच्या बाळाला जन्म देणार आहे. या रुग्णालयात तिचं नाव नोंदविण्यात आलं आहे. आलिया भट्ट ही २० ते ३० नोव्हेंबर या दिवसांमध्ये बाळाला जन्म देऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्यापूर्वीच ते रुग्णालयात पोहोचल्यामुळे येत्या काही दिवसातच चाहत्यांना बाळाची गुडन्यूज मिळणार असल्याचे बोललं जात आहे.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे लग्न १४ एप्रिल २०२२ रोजी मुंबईत झाले होते. लग्नानंतर दोन महिन्यांनी म्हणजे जून महिन्याच्या अखेरीस त्यांनी चाहत्यांना ही गुडन्यूज दिली होती. लवकरच आलिया तिच्या बाळाला जन्म देणार आहे, असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान गेल्या वर्षभरात रणबीर ब्रह्मास्त्र आणि शमशेरा या चित्रपटात झळकला आहे. तर दुसरीकडे २०२२ हे वर्ष आलियासाठी फारच खास राहिले आहे. तिचा गंगूबाई काठियावाडी, आरआरआर, डार्लिंग आणि ब्रह्मास्त्र हे चित्रपट चांगलेच हिट ठरलेत. त्याबरोबरच आता लवकरच ती रॉकी और रानी की प्रेम कहानी आणि हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटात झळकणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment