बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा सिनेसृष्टीत हटके भूमिकांसाठी ओळखला जातो. विकी कौशलने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात अभिनेत्री कतरिना सोबत लगीनगाठ बांधली. ते दोघे त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. सध्या विकी कौशलची पत्नी कतरिना ही तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. विकी कौशल आणि दीपिका पदुकोण यांच्यात काही कारणांमुळे वाद झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. एकदा एका मुलाखतीत विकी कौशलने दीपिका पदुकोणबद्दल तसे भाष्य केले होते.
दीपिका पदुकोण ही सध्या सिनेसृष्टीतील आघाडीच्या नायिकांपैकी एक म्हटली जाते. ती कायम चर्चेत असते. काही वर्षांपूर्वी दीपिका आणि विकी यांच्यात काही कारणांमुळे मतभेद झाले होते. त्या दोघांनीही एकत्र स्क्रीन शेअर करण्यास नकार दिला होता. मात्र त्यानंतर कतरिनाच्या लग्नाच्या फोटोंवर दीपिकाने कमेंट करत अभिनंदन देखील केले होते.
विकी कौशलने त्याच्या राझी या चित्रपटादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत त्याला रॅपिड फायरचे प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी त्याला कतरिना किंवा दीपिका यातील एकाची निवड करण्याबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर त्याने क्षणार्धात ‘दीपिका’ असे म्हटले होते.