भारत जोडो यात्रेत पाचोरा – भडगाव मतदारसंघाचे नियोजन

जळगाव : राहुल गांधी यांनी राष्ट्रीय एकात्मतासाठी सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेत शेगाव येथील विराट सभेत सहभागी होण्यासाठी पाचोरा – भडगाव मतदारसंघातून पाच हजार कार्यकर्ते सहभागी होण्याचे नियोजन केले जात आहे. भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी पाचोरा शहर व तालुक्यातून कॉंग्रेस पदाधिका-यांनी शेगाव येथील विराट सभेच्या नियोजनासाठी पाचोरा येथील विश्रामगृहात बैठक घेतली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

भारत जोडो यात्रेचे जिल्हा समन्वयक अ‍ॅड संदीप पाटील यांच्यासह जिल्हा सरचिटणीस जमील शेख, सेवादलाचे प्रदेश सरचिटणीस अजबराव पाटील, सेवादलाचे जिल्हा अध्यक्ष संजय पाटील, प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकिरा, आदी उपस्थित होते. बैठकीच्या सुरवातीला तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी भारत जोडो यात्रेचे महत्व विषद केले. शेगाव येथे होणा-या विराट सभेला पाचोरा – भडगाव मतदारसंघातुन सुमारे पाच हजार कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

यावेळी अ‍ॅड अमजद पठाण यांनी शहरातील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने शेगावी उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले. शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागात मोफत बस आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबत काही खाजगी वाहने तर काही रेल्वेने जाणार आहेत. जवळपास पाच हजार कार्यकर्ते सहभागी होणार असून ज्यांना एसटी बस हवी असेल त्यांनी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी व शहर अध्यक्ष अ‍ॅड अमजद पठाण यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

बैठकीत सरचिटणीस प्रताप पाटील, कार्याध्यक्ष राजेंद्र महाजन, उपाध्यक्ष शरीफ खाटीक, अरमान मौलाना, युवक कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड अंबादास गिरी, विधानसभा अध्यक्ष शकील शेख, इरफान मनियार, महीला जिल्हा सरचिटणीस कुसुम पाटील, कल्पना निंबाळकर, इस्माईल तांबोळी, अ‍ॅड वसिम बागवान परवेज शेख रसुल, राहुल शिंदे, गणेश पाटील, कल्पेश येवले, धनराज देवरे, रवी सुरवाडे, धनराज देवरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here