अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेला डेट करत आहे. या दोघांनी गुपचूप साखरपुडा केला असल्याचं म्हटले जात आहे. या दोघांचे फोटो व व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सन 2020 मध्ये कोरोना कालावधीत आयरा व नुपूर दोघे एकमेकांच्या अधिक जवळ आले. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आता दोघांनी गुपचूप साखरपुडा केला आहे. याआधी कुठेही आयरा व नुपूरच्या साखरपुड्याची चर्चा झाली नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो व व्हिडीओमध्ये आयराने लाल रंगाचा गाऊन परिधान केला असल्याचे दिसत असून नुपूरने काळ्या रंगाचा कोट, त्याच रंगाची पँट परिधान केली आहे. दोघांनीही अगदी साध्या पद्धतीने साखरपुडा केला असल्याचे दिसत आहे.