दूध विकासचे साजुक तुप, भाव त्याचा स्वस्त!—- विकणारे झाले मस्त, पैसा केला त्यांनी फस्त?

जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघातील तुपाचा भडका उडाला असून त्या भडक्यात पोलिसांच्या भक्षस्थानी सहा जण सापडले आहेत. त्यात कार्यकारी संचालक मनोज लिमये, हरी रामू पाटील, किशोर काशीनाथ पाटील, अनिल हरिशंकर अग्रवाल, चंद्रकांत मोतीराम पाटील उर्फ सी.एम.पाटील, रवी मदनलाल अग्रवाल असे सहा जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. यातील सी.एम.पाटील यांचा पुतण्या किशोर पाटील आहे. दोघे काका – पुतण्याची जोडी पोलिसांच्या ताब्यात आहे.

जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघातील सुमारे विस लाख रुपये किमतीपेक्षा अधिक किमतीचे तुप अवघ्या दिड लाख रुपयांत विकल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. 1800 किलो तुप 85 रुपये दराने प्रशासक समितीची परवानगी न घेता शहरातील विठ्ठल रुख्मिनी सोसायटीला 1 लाख 53 हजार रुपयात विकल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल आहे.

1800 किलो तुपाची मुळ किंमत विस लाखापेक्षा अधिक असल्याची बाब खरी असली तरी ते कमी भावात 85 रुपये प्रति किलो दराने विकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मात्र ते तुप जवळपास शंभर ते सव्वाशे रुपये दराने हरी रामु पाटील यांनी इतरत्र विकल्याचे म्हटले जात आहे. या तुपाच्या अथांग सागराची खोली अर्थात गहराई वरवर तपासली तरी ती बरीच खोल असल्याची लोकांमधे चर्चा आहे. आता जनता सर्व काही समजू लागली आहे. या अथांग सागरात कोणत्या खडकाखाली आणि कोणत्या कपारीत किती तुप जिरले याचा शोध पोलिस घेत असल्याचे म्हटले जात आहे.

मुळ फिर्यादीप्रमाणे 1800 किलो तुप, प्रतीकिलो 85 रुपये किंमतीप्रमाणे भाव ठरला 1 लाख 53 हजार रुपये हा साधा आणि सरळ हिशेब आहे. मात्र एकट्या ऑगस्ट महिन्यातच अकोला निवासी व्यापारी रवी अग्रवाल यांच्यासोबत तुपाचा सुमारे दिड लाख रुपयांचा बॅंकींग व्यवहार झाल्याची जनतेत चर्चा आहे. पोलिस प्रकरणी माहिती देत नसले तरी जनता जनार्दन इकडून तिकडून कानोसा घेत माहिती काढत असल्याचे समजते.

एकट्या ऑगस्ट माहिन्यात रवी अग्रवाल याने हरी पाटील यांच्याकडून सुमारे 1500 ते 1600 किलो तुप खरेदी केल्याचे सुत्रांकडून समजते. यात किती तथ्य आहे हे पोलिस तपासात पुढे येणारच आहे. या सुमारे पंधराशे किलो तुपाचे पुढे काय झाले? ते कुठे गेले? अशी जनतेत कुठे दबक्या तर कुठे खुलेआमपणे चर्चा सुरु आहे.

जळगावचे फटाका व्यापारी अनिल अग्रवाल हे देखील फटाक्यांची विक्री करता करता तुप खरेदी विक्रीत उतरल्याचे म्हटले जाते. तुपाच्या धंद्यात उतरण्याची प्रेरणा त्यांना कुठून मिळाली हे त्यांनाच माहिती. त्यांनी देखील दुध संघाचे सुमारे तेराशे ते पंधराशे तुप खरेदी केल्याचे म्हटले जात आहे.
उरले सुरले बिचारे दुध फेडरेशनमधील गोरगरीब मजुर. त्या मजुरांच्या नावावर देखील तुप खरेदी विक्रीच्या पावत्या फाटल्याचे म्हटले जाते. बिचारे गोरगरीब मजुर ज्यांना दोन वेळच्या खाण्याची भ्रांत, ते काय महागडे तुप स्वस्त किमतीत घेतील असा देखील एक दादा कोंडके पद्धतीने भोळाभाबडा प्रश्न चर्चीला जात आहे. या मजुरांना चटणीवर तेल मिळत नाही म्हणून ते पाणी टाकून आपले पोट भरतात. त्यांच्या नावावर देखील सातशे ते आठशे किलो तुप विकल्याचे दाखवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. एकंदरीत 1800 किलोच्या जवळपास दुप्पट तुप इकडे तिकडे फिरले आहे. त्या दुप्पट तुपाचा प्रवास कुठे कुठे झाला? त्या तुपाला कुठे कुठे शोधू तुला असे म्हणत पोलिस तपास करत असल्याची चर्चा आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here