गुजरात राज्यात 1 आणि 5 डिसेंबर रोजी विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होत आहे. त्यानंतर लागलीच 8 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेस, भाजपा तसेच आप पक्ष पूर्ण ताकदीनिशी प्रचारकार्यात उतरले आहेत. सध्या प्रचाराचे तंत्र बदलले असून भाजपने ‘डिजिटल वॉर रुम’ सुरू केली आहे. भाजपाचे तब्बल पन्नास हजार कार्यकर्ते सोशल मीडियावर प्रचार करत आहेत.
गुजरातमध्ये सोशल मीडियावर प्रचार करण्यासाठी भाजपाने एक वॉर रुम तयार केली आहे. या वॉर रुममध्ये डिजिडल मार्केटिंगचं ज्ञान असलेले तसेच सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या प्रचाराची माहिती असेलेल एकूण १०० तरुण-तरुणी आहेत. यामध्ये काही तरुण हे इंटर्न आहेत. या टीमकडून भाजपाची विकासकामे तसेच भाजपाच्या नेत्यांकडून केल्या जाणारे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जात आहे. याव्यतिरिक्त भाजपाकडे राज्यात १० हजार सोशल मीडिया आहेत. राज्यभारात भाजपाकडे साधारण ५० हजार स्वयंसेवक आहेत जे सोशल मीडियावर प्रचाराचे काम कत आहेत.
भाजपासाठी काम करणाऱ्या या वॉर रूमची एकूण चार भागांत विभागणी करण्यात आलेली आहे. दक्षिण गुजरात, सौराष्ट्र, उत्तर गुजरात, मध्य गुजरात असे हे चार विभाग आहेत. या चार विभागांचे आणखी उपविभाग करण्यात आले आहेत. सुरत सारख्या मोठ्या शहरांचेही वेगवेगळे भाग करण्यात आले आहेत. सुरत शहराचे दोन भाग करण्यात आले आहेत. या दोन विभांसाठी दोन वेगवेगळ्या टीम काम करत आहेत.