‘दिल ले गयी’ गाण्यावर बेभान होऊन नाचली करिश्मा कपूर

बॉलिवूड अभिनेत्री करीश्मा कपूरने आपल्या अभिनयाच्या जोरावर नव्वदचे दशक गाजवले. आमिर खान, शाहरुख खान, गोविंदा आदी नायकांसोबत केलेले तिचे चित्रपट त्याकाळात चांगले गाजले. ‘दिल तो पागल है’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘हम साथ साथ है’, ‘राजा बाबू’, ‘कुली नं 1 असे हिट चित्रपट तिने दिले आहेत.

करिश्माचा एका पार्टीतील नृत्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. चोवीस वर्षानंतर करिश्मा कपूर ‘दिल ले गयी ले गयी’ या गाण्यावर थिरकताना दिसली. एका पार्टीत करिश्माने केलेल्या या डान्सचा व्हीडीओ एका फॅन पेजवरुन शेअर करण्यात आला आहे.

एका मैत्रिणीच्या बॅचलर्स पार्टीतील हा व्हिडीओ असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडीओमध्ये करिश्मा तिच्या मैत्रिणींसह ठुमके लावताना दिसत आहे. पार्टीत करिश्माने काळ्या ड्रेसमधील ग्लॅमरस लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतल्याचंही दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here