सिनेट निवडणूकीविषयी महाविकास आघाडीची बैठक

On: December 5, 2022 5:16 PM

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत नोंदणीकृत पदवीधर गटातून अधिसभा (सिनेट) निवडणूकी संदर्भात महात्त्वाची चर्चा करण्यासाठी मंगळवार दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 4.00 वा. जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल (लेवा भवन) जळगाव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲङ रविंद्रभैय्या पाटील, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रदिपदादा बाळासाहेब पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. विष्णूभाऊ भंगाळे, युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव श्री. विराज कावडीया, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ॲड. कुणाल पवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. देवेंद्र मराठे आदि. पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न होणार आहे. या बैठकीस महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिका-यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment