सहायक सहकार अधिकारी शशिकांत साळवे यांना जामीन

On: December 14, 2022 12:07 PM

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील सहायक सहकार अधिकारी शशिकांत नारायण साळवे (५४. रा. मंगलमूर्तीनगर, पिंप्राळा) यांना कार्यालयाच्या आवारात दहा हजारांची लाच स्वीकारताना शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले होते.

या प्रकरणी जिल्हा न्यायालयातील न्यायमूर्ती खडसे यांच्या न्यायालयात केस न. ११६/२०२२, आज दिनांक १२ डिसेंबर रोजी सुनावणी झाली, सरकार व आरोपी पक्षाकडून युक्तिवाद झाला असता शशिकांत साळवे यांना जामीन मंजूर केला.यावेळी आरोपीतर्फे ॲड. अजयकुमार एस. सिसोदिया, ॲड. दिपक के. सोनवणे, ॲड. दिपक अरुण सपकाळे यांनी कामकाज पाहिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment