अभिनेत्री अभिज्ञा भावेने दारुसंदर्भात शेअर केली पोस्ट

On: December 23, 2022 8:49 PM

अभिनेत्री अभिज्ञा भावे सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘तू तेव्हा तशी’ मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेमध्ये ती साकारत असलेलं वल्ली हे पात्र प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडत आहे. तिची ही नकारात्मक भूमिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आज छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये अभिज्ञाचं नाव आवर्जून घेतलं जातं.

अभिज्ञाच्या वाटेला बऱ्याचदा नकारात्मक भूमिका आल्या. पण नकारात्मक भूमिका साकारत असताना प्रेक्षकांचेही बरेच टोमणे ऐकायला मिळतात असं तिने स्वतःच सांगितलं होतं. आताही तिने एक शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.

अभिज्ञाने शॉर्ट ड्रेस परिधान केलेले फोटो शेअर करत म्हटलं की, “काहींना असं वाटतं की मी नकारात्मक भूमिका साकारते म्हणून माझ्यासमोर ठेवलेल्या कोणत्याही फॅन्सी ग्लासामध्ये दारू असणं आवश्यक आहे. त्यांच्यासाठी सांगते की, प्रत्येक गोष्टीचा मर्यादित आनंद लुटण्यामध्ये काहीही वाईट नाही. पाणी व दारू नसलेले मॉकटेल्सही फॅन्सी ग्लासमध्ये दिले जातात.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment