पो.कॉ. विनोद अहिरे करणार 63 व्या पोलीस स्थापना दिनाला 63 कि.मी. स्केटिंगचा विक्रम

जळगाव : 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाल्याची अधिकृत घोषणा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली, त्यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान करण्यात आला. त्या दिवसापासून 2 जानेवारी हा पोलीस स्थापना दिवस साजरा करण्यात येतो. 2 जानेवारीपासून पूर्ण आठवडा महाराष्ट्र पोलीस आपापल्या घटकात विविध उपक्रम राबवून साजरा करत असते. त्यात  जळगाव जिल्हा पोलीस दल पोलीस बँडची विविध धुन वाजवून, शस्त्र प्रदर्शन, रॅली काढून साजरा करत आहे.

दरम्यान जळगाव जिल्हा पोलीस दलातील राष्ट्रीय खेळाडू विनोद अहिरे हे पोलीस वसहतीतील एक किलोमीटरच्या रोड ट्रॅकवरून सलग 63 किलोमीटर स्केटिंग करुन महाराष्ट्र पोलीस सप्ताह साजरा करणार आहेत. अशा पद्धतीने पोलीस खात्यात वीस वर्ष सेवा झालेले, वय वर्ष 44 हून अधिक असलेले पोलीस कर्मचारी विनोद अहिरे हे 63 किलोमीटर स्केटिंग करून पोलीस स्थापना दिन साजरा करणार आहेत. हि महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील पहिलीच घटना असेल. दिनांक 8 जानेवारी 2023 रविवार रोजी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत पोलीस मुख्यालयातील 252(नवीन इमारत) बिल्डिंग नंबर पाच समोरून सकाळी आठ अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी हे विनोद अहिरे यांना हिरवी झेंडी दाखवतील.

यापुर्वी देखील विनोद अहिरे यांनी त्यांचा चाळीसावा वाढदिवस सलग 40 किलोमीटर स्केटिंग करून साजरा केला आहे. त्याचबरोबर ते कराटे,आईस हॉकी, जलतरणाचे राष्ट्रीय खेळाडू आहेत. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त शहरवासीयांसह खेळाडूंनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here