पोलिसासह त्याच्या मित्राला मारहाण – एक ताब्यात

जळगाव : पोलिसासह त्याच्या मित्राला मारहाण करणा-या  तिघांपैकी एकाला एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे. सुनिल सुभाष साळवे (रा. पळासखेडे ता. सोयगाव जिल्हा औरंगाबाद) असे ताब्यातील संशयीताचे नाव आहे.

मिर्झा मोहंमद इसराल हिमायु बेग हा जामनेर येथील रहिवासी तरुण औरंगाबाद पोलिस दलात नोकरीला असून सोयगाव पोलिस स्टेशनला हवालदार पदावर कार्यरत आहे. 9 जानेवारी रोजी मिर्झा हा त्याचा जामनेर येथील मित्र समीर सलीम शेख याच्यासोबत जळगाव येथे प्लॉट बघण्यासाठी आला होता. प्लॉट बघण्याचे काम आटोपून दोघे मित्र रात्री जामनेर येथे मोटारसायकलने परत जात होते.

वाटेत कुसुंबा गावानजीक हॉटेल राकेश येथे दोघे जण जेवण करण्यासाठी थांबले. त्यावेळी तिघा अनोळखी इसमांनी समीर शेख याला शिवीगाळ व चापटाबुक्क्यांनी मारहाण  करण्यास सुरुवात केली. सुरु असलेला वाद आणि मारहाण सोडवण्यासाठी मिर्झा मोहंमद याने मध्यस्ती केली असता त्याला देखील तिघांनी मारहाण करण्यात आली. या घटनेप्रकरणी मिर्झा याने एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला.

पो.नि. जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे, आनंदसिंग पाटील, पोलिस नाईक किशोर पाटील, विकास सातदिवे आदींनी तपासाअंती सुनिल सुभाष साळवे यास ताब्यात घेतले आहे. हॉटेलमधील सीसीटीव्ही पाहणीत मारहाण करणारे आकाश विश्वे रा. सुप्रिम कॉलनी जळगाव, सुनिल सुभाष साळवे आणि सुनिल सोनार अशी त्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास हे.कॉ. गफुर तडवी आणि पो.कॉ. सिद्धेश्वर डापकर करत आहेत.   

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here