माजी खासदार विजयराव मुंडे यांचे निधन

On: August 16, 2020 1:31 PM

वर्धा : वर्धा येथील माजी खासदार विजयराव मुडे यांचे आर्वी येथे 15 ऑगस्टच्या सायंकाळी ७ वाजता निधन झाले. ते सन 1995-96 या काळात वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. एक वर्ष महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार म्हणून देखील त्यांनी कामकाज केले.

त्यांच्या खासदारकीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी वर्धा येथे हिंदी विश्वविद्यालयाची स्थापना केली. या स्थापनेत विजयराव मुडे यांचा मोठा सहभाग होता. माजी खा. मुडे यांची कन्या अर्चना मुडे-वानखेडे या वर्धा जिल्हा भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment