जळगाव : एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार शेख जुनेद उर्फ बवाली शेख (रा. नवीन तांबापुर बिलाल चौक जळगाव) यास दोन वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. शेख जुनेद याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. तांबापुरा परिसरात त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे सामाजिक जीवनात अशांतता निर्माण झाली होती.
शेख जुनेद याच्या वाढत असलेल्या गुन्हेगारी कारवाया लक्षात घेत एमआयडीसी पोलिस स्टेशनकडून त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. उप विभागीय दंडाधिकारी महेश सुधाळकर यांच्याकडे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला कारवाईचे मुर्त स्वरुप देण्यात आले.
पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलिस उप निरीक्षक आनंदसिंग पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. योगेश बारी, सचीन पाटील आदींनी या कारवाईकामी परिश्रम घेतले.