पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभास्थळी स्वागत कमान कोसळल्याने एक पोलिसकर्मी जखमी

मुंबई : मुंबईतील मेट्रो २अ आणि मेट्रो ७ या मार्गिकांचं लोकार्पण आणि इतर अनेक विकासकामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दाखल झाले. मुंबईच्या बीकेसी मैदानावर या विकासकामांचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर मेट्रो मार्गिकांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अंधेरीतील गुंदवली मेट्रो स्टेशनला रवाना होण्याआधीच सभास्थळी एक दुर्घटना घडली. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी मुंबईच्या बीकेसी मैदानावर जोरदार तयारी करण्यात आली आहे. या मैदानावर मोदींच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत असतानाच मैदानाच्या बाहेरच्या बाजूला उभारण्यात आलेली एक तात्पुरती कमान कोसळल्यामुळे सभास्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या कमानीखाली सुरक्षेसाठी तैनात असणारे पोलीस कर्मचारी यामध्ये जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांना लागलीच नजीकच्या रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. सभास्थळी कोणतीही गैरसोय होऊ नये, म्हणून कोसळलेली कमान लागलीच हटवण्यात येऊन त्या ठिकाणी सुव्यवस्था राखण्याचं काम आयोजकांकडून करण्यात आलं.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here