25 हजाराची लाच – ग्रामसेवक अडकला एसीबीच्या सापळ्यात

जळगाव : विटभट्टी व्यवसायासाठी ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला देण्याकामी लाच म्हणून 25 हजाराची लाच मागणी करुन तीचा स्विकार करणा-या ग्रामसेवकाला जळगाव एसीबीच्या पथकाने आज रंगेहाथ पकडले आहे. राजेंद्र लक्ष्मण पाटील असे निम ता. अमळनेर येथील त्या ग्रामसेवकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध मारवड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराचा गेल्या तीस वर्षापासून ग्रामपंचायत हद्दी विट भट्टीचा व्यवसाय सुरु आहे. तक्रारदाराने नियमानुसार अमळनेर तहसील कार्यालयात सहा हजार रुपयांची रॉयल्टी देखील भरली आहे. तरी  देखील नाहरकत दाखला देण्याकामी राजेंद्र पाटील या  ग्रामसेवकाने 25 हजाराची लाच  मागीतली होती.

तक्रारदाराने एसीबी जळगाव कार्यालयात केलेल्या तक्रारीनुसार सापळा लावण्यात आला होता. ग्रामपंचायत कार्यालय निम ता. अमळनेर येथे त्याला रितसर रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिस उप अधिक्षक तथा  सापळा अधिकारी शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.संजोग बच्छाव, पो.ना. ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ ,पो. कॉ. सचिन चाटे, पो.नि. एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.बाळु मराठे, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी आदींनी या सापळा कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here