एमपीडीए कायदयाअंतर्गत भुसावळचा मुकेश भालेराव स्थानबद्ध

On: January 23, 2023 9:12 PM

जळगाव : भुसावळ शहरातील मुकेश प्रकाश भालेराव (रा. टेक्निकल हायस्कूल मागे भुसावळ, ह.मु. भिलवाडी यावल नाका भुसावळ) या तरुणास एमपीडीए कायद्याखाली स्थानबद्ध करण्यात आले आहे. मुकेश भालेराव याच्याविरुद्ध भुसावळ शहर व भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला विविध गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार आणि दंगा, आत्महत्येचा प्रयत्न करणे, भारतीय हत्यार कायद्याखाली प्रत्येकी एक असे एकुण सात गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध वेळोवेळी प्रभावी प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली आहे.

पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी (जळगाव), अप्पर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे (चाळीसगाव), डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे आदींच्या मार्गदर्शनाखाली स्थनिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील, भुसावळ शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. गजानन पडघन यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार युनुस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ जयंत भानुदास चौधरी व भुसावळ शहर पो.स्टेचे पोलीस उप निरीक्षक आसिफ खान युसूफ खान, सहायक फौजदार मोहम्मद अली, पोहेकॉ अनिल चौधरी, पोहेकॉ संजय पाटील, पोहेकॉ सुपडा पाटील, पोना विकास बाविस्कर, पोकॉ भूषण चौधरी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. जिल्हादंडाधिका-यांच्या आदेशाने मुकेश भालेराव याची मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे रवानगी करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment