जळगाव जिल्हा क्रिकेट असो.निवड चाचणी संपन्न

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे दिनांक 22 जनवरी 2023 रोजी वरिष्ठ गटासाठी आंतर जिल्हा क्रिकेट निवड चाचणी आयोजन अनुभूती आंतरराष्ट्रीय शाळेच्या मैदानावर शिरसोली रोड येथे करण्यात आले होते. या निवड चाचणीसाठी जिल्हाभरातून एकूण १४० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. त्यातून निवड समितीने ३८ खेळाडूंची प्राथमिक निवड केली आहे. निवड झालेले खेळाडू पुढील प्रमाणे आहेत.

जेसल पटेल ,नीरज जोशी, राहुल निंभोरे , साहिल गायकर, वरून देशपांडे,  सिद्धेश देशमुख , सौरभ सिंग,  तनिष जैन, बिपिन चांगले, रोहन चंद्रकांत पाटील , दर्शन खैरनार, क्रिशी नथानी , कुणाल फालक,  पार्थ देवकर , प्रथमेश सरोदे, दर्शन दहाड,  गौरव ठाकूर,  अमिन पिंजारी,  तुळजेस पाटील,  कौशल वीरपणकर, इर्तेकाज अन्वर,  प्रदीप पाटील,  शुभम शर्मा , पंकज महाजन , कैलाश पाटील, हितेश नायदे,  उदय सोनवणे , स्वप्निल जाधव,  राज गुप्ता,  खुशाल भोई,  निहाल अहमद , रोहित तलरेजा,  रिषभ कारवा , नचिकेत ठाकूर,  जगदीश झोपे,  प्रज्वल पाटील , अंकित मंडल , सागर पाटील.

या खेळाडूंची निवड समितीचे अध्यक्ष संजय पवार, प्रशांत ठाकूर, ॲड.सुरज जहागीर , प्रशांत विरकर व शंतनु अग्रवाल यांनी केली आहे  तरी सर्व खेळाडूंनी बुधवार दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ०९.०० वाजता अनुभूती आंतरराष्ट्रीय शाळेच्या मैदानावर क्रिकेट साहित्य व पांढरा गणवेश सहा मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकुल यांना संपर्क साधावे असे जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष एस टी खैरनार, सचिव अरविंद देशपांडे , सहसचिव अविनाश लाठी यांनी केली व पुढील वाटचालासाठी शुभेच्छा दिली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here