चाळीसगावच्या 11 जणांवर मोक्काची कारवाई

जळगाव : चाळीसगाव शहरातील 19 जणांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल गु.र.नं. 485/22 भादंवि 307, 324, 143, 147, 148, 149, 120 (ब) नुसार दाखल गुन्ह्यातील टोळी प्रमुख आरोपी अमोल छगन गायकवाड (रा.स्वामी समर्थ कॉलनी, नागद रोड, चाळीसगाव) याच्यासह टोळी सदस्य सुमित ऊर्फ बाबा अशोकराव भोसले (अटकपुर्व जामीनावर), कृष्णा छगन गायकवाड (दोघे रा.नागद रोड,चाळीसगाव), संतोष ऊर्फ संता पहेलवान रमेश निकुम रा.हिरापुर ता.चाळीसगाव जि.जळगाव, विक्की ऊर्फ शुभम विजय पावले, श्याम ऊर्फ सॅम नामदेव चव्हाण दोघे रा.हिरापुर ता.चाळीसगाव,  सचिन सोमनाथ गायकवाड (रा.बाबाजी चौक चाळीसगाव), जयेश दत्तात्रय शिदे (पाटील) रा.भोरस खुर्द ता.चाळीसगाव, उद्देश ऊर्फ गुटु सुधीर शिंदे रा.हिरापुर ता. चाळीसगाव, योगेश रतन पांचाळ (पडवळकर) रा.हिरापुर ता.चाळीसगाव, पुष्पराज ऊर्फ सुनिल जगताप रा.पिंपळरखेड ता.चाळीसगाव (गुन्हा दाखल परंतु फरार) अशी सर्व अकरा आरोपींची नावे आहेत. चाळीसगाव पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डवर या सर्वांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.

पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी आणि रमेश चोपडे, चाळीसगाव उप विभागाचे सहायक पोलिस अधिक्षक अभयसिंह देशमुख आदींनी स्थानिक गुन्हे शाखेचे व.पो.नि.किसनराव नजनपाटील, चाळीसगाव शहर पो.स्टे.चे पो.नि. पाटील यांना योग्य ते मार्गदर्शन करुन या टोळीविरुद्ध मोक्का कायद्याचे कलम वाढवण्यासह प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किसनराव नजनपाटील व त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार सहायक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे तसेच चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. के.के.पाटील, सहा.पो.निरीक्षक विशाल टकले यांनी या कारावाईकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here