शाहरुख खानच्या ‘पठाण’ची बॉक्स ऑफीसवर बक्कळ कमाई

On: January 28, 2023 7:13 PM

शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. २५ जानेवारी रोजी चित्रपट प्रदर्शित होताच किंग खानच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर गर्दी करत आहेत. चित्रपटाला मिळालेले यश पाहून शाहरुख खान भारावून गेला आहे.

शाहरुख म्हणाला, “आपल्या मुलाचं होणारं कौतुक पाहून वडील जितके आनंदी होतात तितकाच मी आनंदी आहे.” शाहरुख चाहते त्याच्यावर करत असलेलं प्रेम पाहून आनंदी झाला आहे. जगभरात या चित्रपटाने आतापर्यंत ३०० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. शाहरुख व दीपिकासाठी हे मोठं यश आहे. ‘दंगल’, ‘बाहुबली २’, ‘केजीएफ २’ सारख्या चित्रपटांप्रमाणेच ‘पठाण’ही कमाई करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment