वो जब याद आये….5 फेब्रुवारीला लतादीदींना आदरांजली

जळगाव : सोमवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२२ रोजी एका घरंदाज सुराचा अस्त झाला. भारतरत्न लता मंगेशकर यांनी या दिवशी आपल्या जीवनाची भैरवी गाऊन आपली जीवनरुपी संगीत मैफल संपविली. या गानसरस्वतीने, स्वरलतेने, गणकोकिळीने अर्थात स्वरसम्राज्ञीने अनेक दशकांपासून आपल्या सुरांचे गारुड संपूर्ण भारत वर्षातच नव्हे तर संपूर्ण विश्वातील रसिकांवर घातलं सुगम संगीतापासून ते चित्रपट गीतांपर्यंत भक्ती गीतापासून गझल पर्यंत असा एकही सांकेतिक अविष्कार नाही जो लतादीदींनी आपल्या सुरेल गळ्यातून रसिकांपर्यंत पोहोचविला नाही.

लतादीदींच्या या संगतीत सेवेचे अनंत उपकार रसिकांवर आहेत त्यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या उपकारांची परतफेड त्यांना स्वर्ण रक्त सुमनांजलीने करण्याचा मानस स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानला वाटला आणि या खानदेश कन्येच्या सांगीतिक जगावर केलेल्या उपकारांची परतफेड करण्याचा एक छोटासा खारीचा वाटा प्रतिष्ठानने उचलला आहे. “वो जब याद आये….” या कार्यक्रमाचे आयोजन करून.

दीदींना आदरांजली वाहण्यासाठी प्रतिष्ठानचे प्रतिभावंत कलावंत मयूर पाटील, मयूर चौधरी, मानसी आळवणी, व ऐश्वर्या परदेशी रसिकांसमोर विविध गीते सादर करणार आहेत. त्यासोबतच डॉ. अपर्णा भट यांच्या विद्यार्थिनी नृत्यांजलीच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंदोर स्थित अविनाश देवळे करणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभणार आहे ती शहराच्या प्रथम नागरिक अर्थात महापौर सौ जयश्री महाजन व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री एम. राजकुमार यांची. या कार्यक्रमाचे रेडिओ पार्टनर म्हणून माय एफ. एम. ९४.३. चे युनिट हेड श्री. अदनान देशमुख यांची. रविवार दि. ५ फेब्रुवारी या दीदींच्या स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला संध्याकाळी ठीक ७ वाजता हा कार्यक्रम भाऊंच्या उद्यानात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशनचे सहकार्य लाभत आहे.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here