अट्टल दरोडेखोरांना गजाआड केले एलसीबीने

जळगाव : कंपनीच्या रखवालदाराचे हातपाय बांधून त्यास दमदाटी करण्यासह जिवे ठार मारण्याची धमकी देत ट्रान्सफॉर्मरचे क्वाईल व कॉपर बळजबरीने घेवून जाणा-या आठपैकी तिन दरोडेखोरांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. इमरान शेख रहिम शेख (रा. 100 फुटी रोड चाळीसगाव चौफुली धुळे), वसीम खान सलार खान (रा. खेसर कॉलनी औरंगाबाद), शेख असद शेख फिरोज उर्फ सलमान (रा. हान्फीया मशीद जवळ बसेरा कॉलनी औरंगाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. गुन्ह्यात वापरलेले स्कॉर्पिओ आणि अशोक लेलॅंड अशी  दोन वाहने देखील हस्तगत करण्यात आली आहेत. एरंडोल पोलिस स्टेशनला या घटनेप्रकरणी भाग 5 गु.र.न. 15/23 भा.द.वि. 395, 392, 342, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरु होता.

सर्व आरोपींनी महिंद्रा स्कॉर्पीओ (एमएच 18 डब्ल्यु 8515) व अशोक लेलॅन्ड (एमएच 20 जीसी 1632) या वाहनांनी एरंडोल येथील अंगारख ट्रान्सफारमर प्रा. लि. कंपनी गाठली होती. या कंपनीच्या रखवालदाराचे हातपाय बांधून त्यास दमदाटी करुन जिवेठार मारण्याची धमकी देत ट्रान्सफरमरचे क्वाईल व कॉपर बळजबरीने घेवून गेल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याची अटकेतील तिघांनी कबुली दिली आहे.

गुन्ह्यात वापरलेल्या दोन अज्ञात वाहनांपैकी स्कॉर्पिओ हे वाहन तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे निष्पन्न करण्यात आले. तांत्रीक विश्लेषणासह गुप्त बातमीदारांकडून पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजलेल्या माहितीच्या आधारे या वाहनांचा शोध घेण्यात आला. स्कॉर्पिओ हे वाहन धुळे शहरात तपास पथकाला आढळून आले. स्कॉर्पिओ या वाहनावरील चालक इमरान शेख रहिम शेख यास ताब्यात घेवून पोलिस पथकाने खास पद्धतीने विचारपूस केली असता त्याने अधिकची माहिती दिली.

त्या माहीतीच्या आधारे गुन्ह्याची व तपासाची कडी जुळत गेली. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यात वापरलेले दुसरे वाहन अशोक लेलॅन्ड हे औरंगाबाद येथील भाजी मार्केटमधे आढळले. या वाहनाजवळ आलेल्या दोघा संशयीतांना ताब्यात घेतले असता गुन्ह्याची पुढील कडी जुळून आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यातील तिघांनी आपला गुन्हा कबुल केला. त्यांना अटक करण्यात आली.  

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक गणेश चोबे, पोलिस उप निरीक्षक अमोल देवढे, सहयक फौजदार रवी नरवाडे, हे.कॉ. राजेश मेंढे, संजय हिवरकर, अशरफ शेख, महेश महाजन, अक्रम शेख, संदिप सावळे, दिपक पाटील, पोना संतोष मायकल, नंदलाल पाटील, भगवान पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, राहुल बैसाणे, ईश्वर पाटील, लोकेश माळी, चालक हे.कॉ. भरत पाटील, अशोक पाटील, मुरलीधर बारी आदींनी या  गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास एरंडोल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. गणेश आहेर व त्यांचे सहकारी करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here