विनयभंग प्रकरणी प्रौढाला सहा महिने कारावास

जळगाव : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दिलीप सोनू कोळी (५७, रा. नशिराबाद) या आरोपीला न्यायालयाने सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा निकाल जळगावचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुवर्णा कुलकर्णी यांनी दिला.

दिलीप कोळी याने २६ ऑगस्ट २०१५ रोजी सकाळी एका महिलेचा विनयभंग केला होता. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली होती. हा खटला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात सुरू होता. सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. निखिल कुलकर्णी व अ‍ॅड. अनिल गायकवाड यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

भा.द.वि. कलम ३५४ (अ) (१) (४) प्रमाणे सहा महिन्यांची कारावासाची शिक्षा, एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद. भादंवि कलम ५०९ प्रमाणे सहा महिन्यांची कारावासाची शिक्षा, एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद. एकूण दंडाची २ हजार रुपयांची रक्कम ही फिर्यादी महिलेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here