जळगाव एमआयडीसी परिसरात मध्यरात्री आग

जळगाव : जळगाव एमआयडीसी परिसरातील व्ही सेक्टर हॉटेल सुमेरसिंग च्या मागील भागात असलेल्या 33/11 केव्ही डिस्ट्रीब्युशन सब स्टेशनसमोर असलेल्या डीपीला मंगळवार 7 फेब्रुवारीच्या रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच मनपाच्या अग्नीशमन पथकाने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

याप्रसंगी चालक नासीर अली शौकत अली, फायरमन नितीन बारी, पन्नालाल सोनवणे यांनी आग आटोक्यात आणली. इलेक्ट्रीक डीपीला आग लागली असल्यामुळे पाणी व फोमचा मारा करुन आग आटोक्यात आणली गेली. आगीच्या या घटनेत अंदाजे 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंंदाज वर्तवला जात आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here