घरफोडी करणारे दोघे पिंपळनेर पोलीसांच्या जाळयात

पिंपळनेर : चोरी, घरफोडी करणा-या दोघांना पिंपळनेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. प्रथम ऊर्फ नानु अनिल नगरकर आणि विक्की उर्फ विवेक अविनाश बच्छाव अशी पिंपळनेर येथील दोघा अठरा वर्ष वयोगटातील तरुणांची नावे आहेत. याशिवाय ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा विधीसंघर्षीत बालकांना बाल न्यायालय धुळे येथे हजर करण्यात आले.

अटकेतील दोघांचा मुख्य साथीदार नितिन ऊर्फ राजुभाई काळु पवार हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. फरार नितीन पवार हा दिवसभर कॉलनी परिसरात फिरुन बंद घरांची रेकी करत असे. त्याने सांगितलेल्या माहितीनुसार चो-या, घरफोड्या केल्या जात होत्या. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पिंपळनेर पोलिस स्टेशनला दाखल घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. अटकेतील दोघांकडून सोन्या चांदीचे दागीने, रोख रक्कम तसेच मोबाईलसह 71 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी पिंपळनेर शहरातील राजेसंभाजी नगर येथील रहिवासी जयेश दिलीप देवरे यांच्याकडे रात्रीच्या वेळी घरफोडी झाली होती. तसेच पिंपळनेर येथीलच बालाजी नगर येथील रहिवासी असलेले एलआयसी एजंट संदीप गुलाबराव शिंदे यांच्याकडे देखील घरफोडी झाली होती. हे दोन्ही गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे व त्यांचे सहकारी सहायक फौजदार अशोक पवार, पोहेकॉ कांतिलाल अहिरे, पोना प्रकाश मालचे, पोकों विजय पाटील, पोकॉ हेमंत पाटोळे, पोकॉ. प्रदिप ठाकरे, चापोकॉ. पंकज वाघ, चापोकॉ. दावल सैंदाणे, चापोकॉ. नरेंद्र परदेशी, चापोकॉ. रविंद्र सूर्यवंशी आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here