अल्पवयीन मुलीवर बलात्कार – दोघांना दहा वर्ष सक्तमजुरी

जळगाव : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर ती गर्भवती राहिल्याप्रकरणी दोघांना दहा वर्ष सक्तमजुरीसह 30 हजार रुपये दंढाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भुसावळ सत्र न्यायाधीश आर. एम. जाधव यांच्या न्यायलयाने हा निकाल दिला आहे.

सुरेश सुकदेव कोळी (52) आणि समाधान प्रल्हाद पाटील (32) अशी या शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांविरुद्ध वरणगाव पोलिस स्टेशनला 20ऑक्टोबर 2015 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. भुसावळ तालुक्यातील अल्पवयीन मुलगी त्यावेळी इयत्ता नववीत शिकत होती. आरोपी सुरेश व समाधान यांनी तिला धमक्या देत तिच्यावर सतत बलात्कार केला.

भुसावळ सत्र न्यायालयात या खटल्याचे न्यायालयीन कामकाज चालले. सरकार पक्षातर्फे एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलगी, तिची आई, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी यांची साक्ष तसेच आरोपीचा डीएनए अहवाल महत्त्वाचा ठरला. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील अ‍ॅड. विजय खडसे यांनी तर आरोपीतर्फे अ‍ॅड. राजेश कोळी व अ‍ॅड. अकील इस्माईल यांनी कामकाज पाहिले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here